
सडक अर्जुनी : दि. 24/01/2025 तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटने कडून केमिस्ट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन दि. 24 जाने. 25 ला सकाळी 8 ते सायंकाळी 6वाजे पर्यंत तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्वप्रथम धन्वंतरी पूजन करून रक्तदानाला सुरवात करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. सतीश लंजे, डॉ. प्रभाकर गहाणे, डॉ. रोशन देशमुख, डॉ. धनंजय कापगते, संदीप राऊत, धर्मेंद्र कटरे, शरद रहिले, प्रकाश वंजारी, छगन कापगते तसेच सर्व तालुका पत्रकार निलेशकुमार शहारे यांनी रक्तदान केले .यावेळी संपादक डॉ. सुशील लाडे पत्रकार ओमप्रकाश टेंभूर्णे, शाहिद पटेल उपस्थित होते. डॉक्टर असोसिएशन, औषधी विक्रेता संघ, सृष्टी फॉउंडेशन उपस्थित होते. या शिबिरात 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


Leave a Reply