Advertisement

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 महामार्ग पोलिस डोंगरगाव (डूग्गिपार) द्वारे समारोपीय कार्यक्रम संपन्न

महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव कॅम्प (डूग्गिपार) द्वारे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 समरोपिय कार्यक्रम संपन्न.

सडक अर्जुनी – महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव कॅम्प डूग्गिपार येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह 2025 कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबिर, वाहन चालकांना. हेल्मेट वितरण, रोड सेफ्टी विषय जन जागृती , कायदे नियम, अशा विविध प्रकारच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मंचकावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रणित पाटील, डूग्गिपार पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोर्डे, महा.पो.केंद्र.चे PSI प्रशांत भुते, दिनेश लिल्हारे API, संपादक डॉ.सुशील लाडे , संपादक बबलू मारवडे, संपादक निलेश शहारे, पत्रकार राजेश मुनेश्वर, अशोका टोल प्लाझा चे नितेश नागरिकर, बोरकर जी, उपस्थित होते तसेच महामार्गाचे पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.

भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा सप्ताह पाळला जातो.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्दिष्ट लोकांना बेजबाबदारपणे किंवा बेजबाबदारपणे वाहन चालवण्याच्या धोक्यांबद्दल शिक्षित करणे आहे. रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित रस्ते आणि जबाबदार ड्रायव्हिंग पद्धतींना पाठिंबा देणे हे रस्ते सुरक्षा सप्ताह 2025 चे उद्दिष्ट आहेत, जो वार्षिक कार्यक्रम आहे. रस्ता सुरक्षा उपायांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी लोक, गट आणि समुदायांना प्रवृत्त करून, हा आठवडाभर चालणारा हा उत्सव वाहतूक अपघात कमी करण्याचा आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील यांनी रस्ता अपघात विषयावर बोलतांना सांगितले की,

टाटा संस चे पुर्व चेअरमन साईरस मिस्त्री यांचे उदाहरण दिले की, ते प्रवास करताना आपल्या मित्रांसोबत गाडीच्या मागच्या बाजूला बसले आसता अपघात झाला. कारण त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, तेव्हा त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचे निधन झाले, कारण त्यांना गाडीचा पत्रा लागला होता. ते पुढे म्हणाले की, दारू पिऊन गाडी चालवू नये . आणि रक्तदान केले पाहिजे प्रामुख्याने O+ आणि O- ज्या व्यक्तीचे ब्लड आहे त्यांनी रक्तदान केले पाहिजे, कारण हे रक्त मिळत नाही. माझ्या तर्फे आरोग्य शिबिरात काही मदत लागली तर मला सांगा मी तुमची मदत करेन असेही ते बोलत होते.

महामार्ग पोलिस  केंद्राचे PSI प्रशांतजी भुते यांनी सर्व मंचाचे आणि उपस्थित सर्व कर्मचारी  व विद्यार्थी, पालक वर्ग यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *