
💐💐 सत्कार समारोह 💐💐
सडक अर्जुनी :- दि. 04 – 02- 2025 रोज मंगळवारला पंचायत समिती सडक / अर्जूनी येथिल सभापती कक्षात , सडक / अर्जुनी पंचायत समतीतील नवनिर्वाचित सभापती मा. चेतनजी वडगाये यांचा गोंडवाना गोंड समाज संघटना , हलबा – हलबी समाज संघटना , नँशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन , नँशनल आदिवासी महिला फेडरेशन च्या वतिने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
मा. चेतनजी वडगाये सभापती यांना समाजातील समस्या सांगून , शासकीय योजनेचा जास्तीत – जास्त लाभ आपल्या समाजाला मिळवून देण्याची विनंती केली असता आदरणीय सभापती महोदयांनी आपण समाजाच्या पाठीशी सदैव असल्याचे सांगितले.
सभापती महोदयांच्या सत्कार प्रसंगी मा. सौ. छायाताई टेकाम , जिल्हाध्यक्ष नँशनल आदिवासी महिला फेडरेशन गोंदिया , मा. संतोष धुर्वे , अध्यक्ष गोंडवाना गोंड समाज संघटना सडक / अर्जुनी मा. सौ. लता कुंभरे अध्यक्ष आदिवासी महिला संघटना स. / अर्जुनी , मा. संजय प्रधान हलबा- हलबी समाज संघटना , मा. श्री . लेखलाल टेकाम माजी अध्यक्ष गो. गो. समाज संघटना स. / अर्जुनी , मा. मधुकर टेकाम , मा. अविनाश मडावी , मा. देवचंद टेकाम , मा. गिरीधारी परतेकी , मा. शैलेश ऊईके , मा. शुभांगी वाळवे , मा. ललिता मडावी , मा. प्रतिभा कुंभरे व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹


Leave a Reply