Advertisement

वैष्णवी हगवणे प्रकरण: सुनेशी क्रूर वागणूक पाप, कडक कारवाईचा फडणवीसांचा इशारा!

AI न्युज नेटवर्क , निलेशकुमार शहारे

 कोल्हापूर : दि.23 मे 2025 एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणे हे चुकीचे आहे. मात्र, अशा परिस्थितीत देखील अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते पाप या ठिकाणी झालेले दिसत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

वैष्णवी हगवणे प्रकरणात आज सकाळीच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. या पुढे देखील हे प्रकरण लॉजिकल एन्डला नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या-त्या गोष्टी पोलिस करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणे, या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्यावर जी कडक कारवाई करता येईल, ती कायद्याने कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी होत आहे. मात्र, मकोका लागण्यासाठी काही नियम असतात. त्या नियमात हे प्रकरण बसू शकते की नाही, हे आज सांगता येणार नाही. त्यामुळे या विषयी जास्त बोलू शकत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अजित पवारांच्या भाष्यावर स्पष्टिकरण

या प्रकरणात अजित पवार देखील अतिशय गंभीर आहेत. त्यांच्या सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच होता की, कोणत्याही कार्यक्रमात किंवा समारंभात, लग्नाला बोलावले तर आपण जातो. त्यावेळी पुढे काय घडणार याची आपल्याला कल्पना नसते. एवढेच सांगण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केला. अजित पवार या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टिकरण दिले आहे.

प्रकरणाला खूप फाटे फोडणे अतिशय चुकीचे

या प्रकरणात पोलिसांनी आता आरोपींना अटक केलेली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. पुढे देखील पोलिस योग्य कारवाई करतील. त्यामुळे या प्रकरणाला खूप फाटे फोडणे अतिशय चुकीचे आहे. या प्रकरणातील आरोपी बिर्याणी खात असतानाचे फुटेज व्हायरल झाले आहे. त्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *