राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय कृषीव्यवसाय व्यवस्थापन, सडक अर्जुनी येथे एनएसएस विशेष श्रमदान शिबीर संपन्न
सडक अर्जुनी, 12 जानेवारी 2025:
राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय कृषीव्यवसाय व्यवस्थापन, सडक अर्जुनी (तर्फे कनेरी, तालुका सडक अर्जुनी) येथे दिनांक 6 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 दरम्यान एनएसएस विशेष श्रमदान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिराची संकल्पना “युथ फॉर माय भारत, युथ फॉर डिजिटल लिटरेसी” अशी होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव मा. जितेंद्र कुमार मौर्या यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेद्रकुमार आराम होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी घाहाणे (पंचायत समिती सदस्य, सडक अर्जुनी), पूर्वी नराह (अध्यक्ष, ग्रामीण शिक्षण संस्था, सडक अर्जुनी), बापूराव मेश्राम (उपप्राचार्य, आरएसएमसीएबीएम), ज्योतिताई पाउलझगडे(सरपंच, ग्रामपंचायत कनेरी), विशाल बागडे (उपसरपंच, कनेरी), व्ही. एन. डोये (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कनेरी), उमेश वाढई (पोलीस पाटील, कनेरी), आनंदराव खोटेले (तंटामुक्ती अध्यक्ष), आणि गजेंद्र खोटेले (शाळा सुधार समिती, कनेरी) हे उपस्थित होते.
शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये डिजिटल साक्षरता, तंत्रज्ञानाबाबत जागृती, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, तसेच ग्रामीण विकास आणि समाजप्रबोधन यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अधिकारी म्हणून आशिष मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. विनय जांभुळकर, प्रा. कल्याणी सोनवणे, प्रा. सुष्मिता मोडक, प्रा. दीपाली शिंदे, प्रा. दीपाली भांडे आणि सुषमा कठाने यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मोनाली कोरे आणि कल्याणी चौधरी या विद्यार्थिनींनी केले.
या शिबिराद्वारे एनएसएस स्वयंसेवकांनी सामाजिक सेवा, लोकसहभाग, आणि युवकांमधील सामाजिक बांधिलकी यांची महत्त्वाची शिकवण दिली. शिबिराचा समारोप विद्यार्थ्यांच्या सकारात्मक सहभागासह आणि अतिथींच्या प्रेरणादायी संदेशाने झाला.




Leave a Reply