
दिनांक 09 ऑक्टोबर 2025 AI NEWS All INDIA
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांकरिता Whatsapp Al Chat BOT (+917447733100) प्रणाली कार्यान्वित-
मा. गोरख भामरे, (भापोसे.) पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी नागरिकांचे सुरक्षा व सुविधा करिता सुरु केलेला आणखी एक नविन स्तुत्य उपक्रम.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे स्थापन करण्यात आलेल्या Whatsapp Al Chat BOT मध्ये नागरिकांना +917447733100 या मोबाइल कर्मकांशी आपल्या व्हाट्सअँप
द्वारे जोडून तुम्हाला फक्त Whatsapp वर Hii चा massage करून विविध सुविधांकरिता पर्याय निवडू शकता. या Whatsapp Al Chat BOT मध्ये महिला सुरक्षा व महिला संबंधी तक्रार करण्यासाठी साठी ” Women Safety”
चे पर्याय दिले आहे. जर आपण सायबर गुन्ह्याचा बळी ठरलात, तर “Cyber Fraud Reporting” चे पर्याय दिले आहे. नागरिकांना कुठल्याही संबंधी ची तक्रार करायची असल्यास
“Online Complaint” चे पर्याय दिले आहे. नागरिकांची काही वस्तू हरवलेली असल्यास त्या संबंधाने पोलिसाना माहिती द्यायची असल्यास “Lost and Found” चे पर्याय दिले आहे.
नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूचीमाहिती पोलिसांना द्यायची असल्यास “Tenant Information”. चे पर्याय दिले
आहे. तसेच नागरिकांना सायबर सुरक्षा आणि जनजागृतीसाठी माहिती व त्या संबंधाने काही माहिती व जनजागृती चे चलचित्रे बघणे करिता “Cyber Awareness ” चे पर्याय दिले आहे.
वरील सर्व पर्यायांची माहिती आपल्याला तीन भाषां (मराठी, हिंदी, इंग्रजी) मध्ये घेऊ शकता. तसेच आपल्याला महिला सुरक्षा किव्हा सायबर सुरक्षा संबंधाने जर आपले काही अतिरिक्त प्रश्न
असतील तर तुम्ही या Whatsapp Al Chat BOT वर प्रश्न विचारू शकता हे प्रणाली तुमचे उत्तर AI पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे ते सुचवेल.
सदर प्रणाली द्वारे महिला सुरक्षा करिता “Women Safety” चे पर्याय निवडले असता आपल्याला Talk to Cyber दीदी व SOS हे दोन पर्याय येतात त्या द्वारे जर महिलेला तात्काळ मदत हवी असल्यास ते Talk to Cyber दीदी हा पर्याय निवड करून महिला कर्मचाऱ्यासोबत बोलू शकतात. तसेच जर महिला धोक्यात असल्यास SOS हा पर्याय निवड करून महिला स्वतःचे live लोकेशन पाठवू शकतात त्या द्वारे त्यान्हा आमच्या भरारी
दामिनी पथक द्वारे तात्काळ मदत पुरवली जाईल.
सदर Whatsapp Al Chat BOT प्रणाली मध्ये जुडण्या करिता प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दी मधील शाळा महाविद्यालय येथे क्यु. आर. कोड चे स्टिकर दर्शनी भागात लावण्यात आलेले
आहेत. यावरील क्यु. आर. कोड नागरिक आपले मोबाईल व्हाट्सअप द्वारे स्कॅन करुन किव्हा +917447733100 हा मोबाइल क्रमांक आपल्या मोबाइल मध्ये जतन करून सदर Whatsapp Chat BOT वर जोडून या प्रणालीच्या सेवांचे लाभ घेऊ शकता. सदर प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत उपलब्ध असुन सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पदधतीने तयार करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी आपली सुरक्षा करिता सदर Whatsapp Al Chat BOT प्रणालीचा
जास्तीत जास्त वापर करावे. असे सायबर पोलीस स्टेशन गोंदिया यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply