Advertisement

जागतिक वन दिवस रॅली काढून साजरा, वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी अंतर्गत;

ए आय न्यूज नेटवर्क

सडक अर्जुनी दि. 21मार्च: प्रत्येक जागतिक वन दिनाच्या दिवशी, देशांना जंगल आणि झाडे यासारख्या वृक्षारोपण मोहिमेशी संबंधित क्रिया करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते. दर वर्षी जग आपल्या जीवनात झाडाचे योगदान साजरे करते. हा दिवस आपल्या जीवनातील वनांचे महत्त्व समजून घेण्यासाठी केला जातो.


असाच एक उपक्रम सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी आज 21 मार्च 2025 रोजी सकाळी 9.00 वा. वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी स्थित-कोहमारा येथे वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल/वनरक्षक यांचेसह मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तसेच गावोगावी फिरून वनाचे व वन्यजीवांचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. आणि जंगल परिसरात वणवा लागणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, आणि वणवा लागल्यास ग्रामस्थांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. आणि नवेगांव/नागझिरा व्याग्र राखीव क्षेत्र पितांबरटोला पर्यटन गेट येथे जाऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी, कु. छबुकांता बी. भडांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, डोंगरगाव,( वन्यजीव विभाग ) यांचे मार्गदर्शनात करण्यात आले. त्यावेळी दोन्ही विभागातील अधिकारी/ कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *