Ai न्युज नेटवर्क निलेशकुमार शहारे
सडक अर्जुनी, 1 मे 2025: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 वा वर्धापन दिना-निमित्ताने सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मोर.अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील तहसीलदार श्रीमती इंद्रायणी गोमासे, जगदीश जांभूळकर नायब तहसीलदार त्रेबंक गुळदे, प्रेरणा कटरे नायब तहसीलदार तथा सर्व कर्मचारी, आणि पत्रकार तथा संपादक सुशील लाडे, निलेशकुमार शहारे, आर.व्ही. मेश्राम, चंद्रमुनी बन्सोड, प्रभाकर भेंडारकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

“महाराष्ट्र दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण सर्वांनी एकजुटीने राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.”
या कार्यक्रमात तहसीलदार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता केली. हा सोहळा स्थानिक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, महाराष्ट्र दिनाचा उत्साह संपूर्ण परिसरात पसरला आहे.


Leave a Reply