Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी फक्त नाव नाही, तर आराध्य दैवत : पंतप्रधान नरेंद्र मोदीची मराठीतुन पोस्ट !

पुणे : दि. 19 फेब्रु. महाराष्ट्रासह देशभरात आज ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर राज्य शासनाच्या वतीने मुख्य शासकीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आराध्य दैवत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी फक्त राजा, महाराजा, राज पुरुष नाहीय, तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठे काहीही नाही, असे नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अमित शहांकडूनही छत्रपतींना अभिवादन

हिंदवी स्वराज्याचा” उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन…, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले.

राजनाथ सिंह काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. त्यांचे अतुलनीय धैर्य, न्यायाप्रती वचनबद्धता आणि लोकांच्या कल्याणासाठी अढळ समर्पण आपल्याला प्रेरणा देत राहील. शिवाजी महाराजांचा निःस्वार्थ सेवा, निष्ठा आणि लवचिकतेचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी समृद्धी आणि शांतीचा मार्ग मोकळा करेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट केले.

राहुल गांधी काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. छत्रपती शिवजी महाराज यांनी जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *