Advertisement

शिक्षकांचे वेतन कधी होणार; भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयातून गायब? पगारावर सही कोण करणार ?

ए आय न्युज नेटवर्क निलेशकुमार शहारे

 भंडारा : दि.19एप्रिल जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन मंजूर वेतन पथक अधीक्षक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत अदा केले जाते. एक तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असतांना पंधरा दिवस होऊन देखील शिक्षकांचे खात्यावर वेतन जमा झाले नाही.

सध्या नागपुर विभागातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याची राज्यभर जोरदार चर्चा असून शिक्षण उपसंचालकाच्या अटकेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील अधिकारीही सावध भूमिका घेत कार्यालयात न येता रजेवर गेले असल्याचे कळले आहे. जिल्हयातील मुख्याध्यापकांचे नियमबाह्य प्रकरणामुळे तत्कालीन शिक्षण अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत. मात्र विद्यमान शिक्षणाधिकारी नोट रिचेबल झाले. त्यामुळे शिक्षकांच्या पगारावर सही करणारे सक्षम अधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार अडले आहेत.

शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा पूर्ण पगार इन्कम टॅक्स मध्ये गेला.त्यामुळे दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, औषधं, जिपीएफ, आयकर,गृहकर्ज,एल. आयसी, इतर कर्जाच्या कपाती मुळे शिक्षकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. मार्चच्या वेतनासाठी वेतन पथक कार्यालयाकडे पुरेशी ग्रंट उपलब्ध आहे. त्यामुळे मार्चच्या वेतनाकडे शिक्षकांच्या नजरा होत्या. मात्र ट्रेझरीत बिल सादर करण्यासाठी सही करणारे शिक्षणाधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालये, नगर परिषद हायस्कूल,ज्युनियर कॉलेज, टप्प्यावरील शाळा, वर्गतुकड्या इत्यादी आस्थापनेत कार्यरत असणारे सुमारे तीन हजाराच्या वर शिक्षक पगारापासून वंचित आहेत.

शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवू नका

जिल्ह्यातील शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवू नका. पगारावर सह्या करण्याचे अधिकार कोणालाही द्यावे. पण आधी शिक्षकांचे वेतन बँकेत जमा करण्याची तात्काळ कार्यवाही करावी.

– राजेश धुर्वे जिल्हा कार्यवाह, विमाशि, भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *