
ए आय न्यूज दि.16 नागपूर: जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना समोर आली आहे. कोरमेटा क्षेत्रातील सिरोंजी हद्दीतील भनगाळा नाला येथे अंधश्रद्धेतून जादूटोण्यासाठी वाघाची शिकार करण्यात आली. शिकाऱ्यांनी वाघाच्या मिशा, दात आणि पंजे काढून नेले आहेत.
वनविभागाचे पथक मध्य प्रदेशातील चाकारा, सारदुनी, तोरणी, चौरेफाटा आणि राघादेवी या छिंदवाडा जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये तपास करत आहे. या भागातील आदिवासी टोळ्या प्रथम जादूटोण्यासाठी आणि नंतर सवयीने वन्यप्राण्यांची शिकार करतात.
मे २०१९ मध्ये रामटेक गडमंदिर परिसरात असाच एक प्रकार घडला होता. वनविभागाने वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली होती. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील हलाल गावातून वाघाचे पुरलेले अवयव जप्त करण्यात आले होते.
स्थानिक लोक शंकरपटाच्या बैल बाजारात बैल बसवणे आणि सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर करतात. दहा ते पंधरा जणांच्या टोळ्या एकत्र फिरतात. या गावकऱ्यांकडे छर्रेमार व भरमार बंदुका आहेत. महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे काम बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेले स्थानिक मजूर, ज्यांना जंगलाची चांगली माहिती आहे, ते शिकाऱ्यांना मदत करतात.


Leave a Reply