
ए आय न्यूज नेटवर्क दि.14 मार्च : मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी. आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटे बोलू नये, आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची, ते त्यांनी करावे अश्या शुभेच्छा देतो असे काँग्रेस नेते नाना म्हणाले.
दरम्यान नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांची विदर्भासाठी जी भूमिका घेत होते ती भूमिका त्यांनी पुन्हा उभी करावी, त्यांनाही होळीच्या शुभेच्छा. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, अशी ऑफर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोलेंच्या या ऑफरची एकच चर्चा रंगली आहे.
नाना पटोले म्हणाले की, अजित पवार, एकनाथ शिंदेंची परिस्थिती काही चांगली नाही. पुढील काळात त्यांचे पक्ष रातील का नाही याची खात्री नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे.
एकनाथ शिंदेंची अवस्था वाईट
नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावे, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू.
वडेट्टीवारांनी सुसाट पळावे
नाना पटोले म्हणाले की, महाविकासआघाडीतील संजय राऊत यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले, अति विद्वान व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राला लाभले आहे. ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत. सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखी मोठे व्हावे, सुसाट पळावे.
नाना पटोलेंनी विरोधी पक्ष म्हणून काम करावे– बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले यांनी विरोधी पक्ष म्हणून 5 वर्षे काम करायला हवे. हेच त्यांच्यासाठी योग्य आहे. मविआला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी महायुतीच्या नेत्यांना ऑफर देऊ नये. आम्ही ऑफर स्वीकारत नाही.


Leave a Reply