गोंदिया : डिजिटल Arrest च्या नावाखाली फसवणुक!
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मो. तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकाला डिजिटल अरेस्ट झाल्या बाबद लाखो रुपयांचा चुना लावला गेला.
नवेगावबांध पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी भोजलाल रामलाल लिल्हारे वय 51 वर्ष शिक्षक राह.लवेरी तालुका- किरणापूर जिल्हा-बालाघाट ह. मु. जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध क्वार्टर क्रमांक 16 तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया असे असुन यांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे. प्रकाश अग्रवाल असे आरोपीचे नाव असुन यांचे मोबाईल क्रमांक 8257885667 असे असुन त्यांची दि. 26/12/2024 रोजी पासुन फसवणूक केल्या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द विविध कलमानुसार तक्रार दिनांक 10/01/2025 रोजी दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 8210107669 वर फोन करून व्हाट्सअप कॉल वरून फिर्यादीस मै पी.ओ. प्रकाश अग्रवाल बॅच नंबर-3378 क्राईम ब्रँच ब्रांच मुंबई से बात कर रहा हूं !आपके नाम पर मुंबई ठाणे मे ईलिगल एडोटाइजमेंट अँड हरासमेंट का केस दर्जे है! और आपके नाम से कॅनरा बँक मे खाता खोला गया है!
और नरेश गोयल ने 2 करोड रुपये अकाउंट से फ्रॉड किया है, जिसके आप 148 वे सस्पेक्ट हो. जिसका 20 % कमिशन आपको दिया है. इसलिये आप अपने सभी खातो की जानकारी दो! उनकी जाच होगी, और ये पैसा आपका सायबर सेफ कस्टडी खाता मे ट्रान्सफर करना होगा, ट्रान्सफर नही किये,तो आपको मुंबई क्राईम ब्रांच मे आना होगा! या तो फिर आपको अरेस्ट करके लायेंगे, तो आपकी क्या इज्जत रह जायेगी, सही पाया गया तो आपके पैसे वापस हो जायेंगे! यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है! यह नॅशनल सिक्रेट है! तुम अभी के अभी एन.आय. खाते मे पाच लाख रुपये ट्रान्सफर करो असे आरोपीने मी लोकसेवक आहे असे बतावणी करून बनावट अरेस्ट वॉरंट मोबाईल व्हाट्सअप वर दाखवून बोलल्याने फिर्यादीने दिनांक 28/12/2014 ला पाच लाख रुपये 5,00,000 /-रुपये दिनांक 27/12/24 ला 4, 68,000/- रुपये व 99,000 रुपये दिनांक 28/12/ 24 ला 2,77,000 रुपये असे एकूण 13,44,000 /- रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खाते क्रमांक वर पाठविले असल्याची माहिती दिली. असून मोबाईल क्रमांक 8257885567 चा धारक इसम नामे प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीस अरेस्ट करण्याची धमकी देऊन फिर्यादीची एकूण 13लाख 44हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक केली आहे. असा फिर्यादीच्या तोंडी तक्रार वरून आरोपीचे कृत्य वरील कलमान्वये होत असल्याने आरोपी विरुद्ध अप. क्रमांक: 03/2025 कलम 336 (2) 319 (2), 318 (4), 340 (2), 204, 351 (2) भा. न्या. स. 2023 सह कलम 66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नवेगावबांध पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.


Leave a Reply