
सडक अर्जुनी :- दि. 26 जानेवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा सोहळा सकाळी 7.30 वाजता संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. डॉ. अविनाश काशिवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी समितीचे संचालक मा. आनंदकुमार अग्रवाल, मा. प्रल्हादजी कोरे, मा. हरिषकुमार बंसोड, मा. विलाश बागडकर, मा. रामकृष्ण नान्हे, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. मुकेश शेलारे यांनी केले, तसेच समितीचे सहसचिव श्री. मुकेश हत्तीमारे व इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.


Leave a Reply