
आलेवाही/सींदेवाही
वाघांसाठी प्रसिद्ध चंद्रपूर जिल्हा आहे. परंतु वाघाच्या सुरक्षेत कुठेतरी दावे खोकले होतांना दिसते, जिथे विशेष करून वन क्षेत्रामधुन रेल्वे लाईन गेलेली आहे आणि त्या ठिकाणी वाघीन आल्यामुळे ती ट्रेनला आधडली त्यामुळे ती मृत्युमुखी पडली. रविवार दि. 19 जानेवारी ला सकाळी बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गाच्या सींदेवाही तहसील अंतर्गत आलेवाही आणि सींदेवाही च्या मदात 12 ते 15 महिने वाघीनी चा मृतदेह आढळला, रक्सौल एक्सप्रेस च्या धडकेने वाघीनीच्या मृत्युचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळाची माहिती मिळताच सींदेवाही वन विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. आणि वाघीनीचा मृतदेह पंचनामा करून, तपासासाठी पशु वैद्यकीय हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला. वर्षानुवर्षे बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गाच्या लगत असलेल्या क्षेत्रात सुरक्षा भिंत किंवा फेंनसिग लावण्यात आली पाहिजे अशी मांग होत होती. मात्र आता पर्यंत वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा विचार करून सुरक्षाभिंत किंवा फेंनसिग लावण्यात आली नाही.


Leave a Reply